Home सामाजिक मुंबईत राज्यस्तरीय ज्योतिष स्नेहसंमेलन व पदवीदान सोहळा संपन्न

मुंबईत राज्यस्तरीय ज्योतिष स्नेहसंमेलन व पदवीदान सोहळा संपन्न

70

डॉ. समीक्षा दारवलीकर यांना ग्रेट क्वीन ऑफ पॅन्टेकल्सपुरस्कार

अनिरुद्ध नक्षत्र इंटरनॅशनल’चा उपक्रम

ज्योतिष शास्त्राच्या जागतिक प्रचाराचा संकल्प

चंद्रपुर : ज्योतिष शास्त्राचा शास्त्रशुद्ध प्रचार-प्रसार व्हावा आणि या क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘अनिरुद्ध नक्षत्र इंटरनॅशनल संस्था, मुंबई’ यांच्या वतीने आयोजित दिग्गज ज्योतिषांचे स्नेहसंमेलन आणि भव्य पदवीदान सोहळा बोरीवली येथील हॉटेल राधाकृष्ण बँक्वेटमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात राज्यभरातील नामवंत ज्योतिषांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पदव्या देऊन गौरविण्यात आले.

.      कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संस्थापक व कुलगुरू डॉ. समीक्षा शिरीष दारवलीकर यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री गणेश स्तुतीने झाली. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्योतिष रत्न विजय जकातदार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अष्टमहागुरु प्रदीप पंडित, होराभूषण मनीष गोसावी, सुहास समुद्र, आणि ॲडव्होकेट मालती शर्मा उपस्थित होते. चंद्रपूर येथील चिंताहरण कपिश्वर देवस्थानचे पुरोहित व संस्थेचे कार्यकारी अधिकारी पं. सतीश गुरुजी यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

अभ्यासपूर्ण व्याख्यानांची मेजवानी
यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अष्टमहागुरु प्रदीप पंडित व हेमंत उपासनी यांनी ‘अष्टकवर्ग’ या कठीण विषयावर अत्यंत सोप्या भाषेत व्याख्यान दिले. ॲड. मालती शर्मा यांनी ज्योतिष शास्त्राचा सामाजिक उपयोग सांगताना ‘घटस्फोट कसे थांबवता येतील’ यावर उपाय सुचवले. अध्यक्षीय भाषणात विजय जकातदार यांनी ज्योतिष्यांनी जातकाला केवळ अशुभ वेळ न सांगता, शुभ काळ आणि सकारात्मकता कशी देता येईल, यावर भर दिला. कुलगुरू डॉ. समीक्षा दारवलीकर यांनी ज्योतिष अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर या शास्त्राचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला.

पुरस्कारांचा वर्षाव
या सोहळ्यात मधुकर घाणेकर यांच्या तर्फे डॉ. समीक्षा दारवलीकर यांना ‘ग्रेट क्वीन ऑफ पॅन्टेकल्स’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहिनूर पदवी’ ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार, अष्टमहागुरू प्रदीप पंडित, डॉ. निलेश कुलकर्णी, अजिंक्य नळोले, ज्योतिष मित्र मिलिंद, दीपक पाटील, अनिल महामुनी, हेमंत उपासनी, मनीष गोसावी, ॲड. मालती शर्मा, ‘विशेष सन्मान’ ज्योतिष महर्षी डॉ. अमित भलिंगे आणि ज्योतिषरत्न सुहास समुद्र, ‘महाराष्ट्रभूषण व वाचस्पती’ पं. सतीश गुरुजी यांना ‘मेडिकल ॲस्ट्रोलॉजी वाचस्पती’ व ‘महाराष्ट्रभूषण’ या पदवीने गौरविण्यात आले ‘ज्योतिर्विद्या वाचस्पती’ अनंत राजाराम आठल्ये, अनिल महामुनी, हेमंत उपासनी, बाबासाहेब देशमुख, सतीश नाईक, ज्योतिष मित्र मिलिंद, जयश्री जोशी, दीपक पाटील, निर्मला बेळमकर, मेघश्याम महामनी, डॉ. मंजुषा व्यवहारे, अनंत लक्ष्मण जोशी. ‘महाराष्ट्र ज्योतीभूषण’ सायली जोशी, रघुनंदन पामडी, कृष्णा पोर्टे, सरिता गंभीर, सुनील जोशी, प्रियंका जोशी, शिवानी कारखानीस, ऋषिकेश देवनहळळी, यशश्री कारखानीस, रेखा छापवाले, उमा देशपांडे, राजेश्री राऊत, जयंत नाईक, रूपा जयंत नाईक, संतोष अंबावले, विकास नालकर आदी. या मान्यवरांना विविध पदव्यांनी सन्मानित करण्यात आले.

.      यावेळी राजकारणातील घडामोडी, खगोलीय घटना जसे की सूर्यग्रहण-चंद्रग्रहण आणि समाजातील भोंदूगिरीवरही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत उपासनी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित सर्व निमंत्रितांसाठी भोजन व अल्पोपहाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती.

error: Content is protected !!