Home सामाजिक ‘पुढे कसे होईल?’ काव्यसंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा

‘पुढे कसे होईल?’ काव्यसंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा

73

चंद्रपुरात साहित्याचा जागर

चंद्रपूर : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आणि स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मा. सा. कन्नमवार सभागृहात कवी शंकर लोडे यांच्या ‘पुढे कसे होईल?’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि निमंत्रितांचे कविसंमेलन उत्साहात पार पडले. हा सोहळा साहित्य आणि संवेदनेचा एक अपूर्व संगम ठरला.

.      कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात शिंदे म्हणाले की, “साहित्याच्या या दरबारात अध्यक्ष म्हणून सहभागी होताना मनाला मोठे समाधान मिळाले. अशा साहित्यिक उपक्रमांमुळेच समाजात विचारांची देवाणघेवाण होते आणि नवीन दिशा मिळते.”

.       यावेळी प्रसिद्ध समीक्षक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी संग्रहातील कवितांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. कवी शंकर लोडे यांची लेखणी समाजातील विविध जळजळीत पैलूंवर मार्मिक भाष्य करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. राजकुमार मुसने, प्रा. डॉ. ज्योत्स्ना मोहितकर आणि किशोर मुघल या दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती होती.

.        कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी प्रा. रत्नाकर चटप आणि संपूर्ण आयोजक टीमचे कौतुक करून आभार मानले. या सोहळ्याला चंद्रपुरातील साहित्यप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

error: Content is protected !!