Home सामाजिक पर्यावरण रक्षणासाठी ‘खांबाडा’ विद्यालयाचा पुढाकार

पर्यावरण रक्षणासाठी ‘खांबाडा’ विद्यालयाचा पुढाकार

156

विद्यार्थ्यांना मिळाले सीड बॉलनिर्मितीचे धडे

सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम

वरोरा : छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खांबाडा येथे बुधवार, २५ मार्च रोजी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग वरोरा, राष्ट्रीय हरित सेना आणि छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पारोधे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून वरोरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शुभांगी पिजदूरकर उपस्थित होत्या. मंचावर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल दिनेश तुरारे, ‘अपास’ संस्थेचे अध्यक्ष तथा वन्यजीव रक्षक विशाल मोरे, वनरक्षक प्रमोद दूधबळे आणि ज्येष्ठ शिक्षक एम. एन. धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

.      यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः ‘सीड बॉल’ (बीज गोळे) कसे तयार करावेत आणि त्यांची योग्य पद्धतीने लागवड कधी व कुठे करावी, याबद्दल सविस्तर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

.        कार्यक्रमाचे संचालन एन. के. खिरटकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एम. एन. धोटे यांनी मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!