Home सामाजिक चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘जागतिक श्रवण दिन’ साजरा

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘जागतिक श्रवण दिन’ साजरा

390

लहान वयातील श्रवणदोष निदान आणि उपचार काळाची गरज

विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

चंद्रपूर : स्थानिक कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान-नाक-घसा (ENT) विभागाच्या वतीने ‘जागतिक श्रवण दिन’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले.

.    यावेळी डॉ. कांबळे यांनी लहान वयातील श्रवणदोषाचे निदान आणि ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रियेचे महत्त्व विशद केले. विभागप्रमुख डॉ. विपिन ईखार यांनी माहिती दिली की, लवकरच महाविद्यालयात बालकांसाठी ‘युनिव्हर्सल स्क्रिनिंग’ आणि ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी ऐकण्यासंबंधी कोणतीही समस्या असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

.      या निमित्ताने एमबीबीएसच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. निवृत्ती जिवने, डॉ. सुरपम यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर्स, निवासी डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिवानी ढवस यांनी केले, तर आभार डॉ. कुणाल कापर्तीवार यांनी मानले.

error: Content is protected !!