Home सामाजिक विसापुरात १४७ महिलांनी पूर्ण केले शिवणकला प्रशिक्षण : प्रमाणपत्रांचे वाटप

विसापुरात १४७ महिलांनी पूर्ण केले शिवणकला प्रशिक्षण : प्रमाणपत्रांचे वाटप

148

ग्रामपंचायतीचा पुढाकार

महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने एक पाऊल

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत प्रशासन आणि ज्ञानगंगा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिन्याचे ‘शिवणकला प्रशिक्षण’ नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या गावातील १४७ महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

.       महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि गावातच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने २४ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान या विशेष वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. युवा कौशल्य नॅशनल अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, शशीकला जीवने, माजी सरपंच रिता जिलटे आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

.       या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रशिक्षणार्थींनी या कौशल्याचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

error: Content is protected !!