Home सामाजिक विसापूरच्या महिलांनी जागतिक महिला दिनी सादर केला कलाविष्कार

विसापूरच्या महिलांनी जागतिक महिला दिनी सादर केला कलाविष्कार

234

दोन दिवसीय कार्यक्रमात पार पडल्या विविध स्पर्धा

भाजपा महिला आघाडी व रणरागिणी महिला मंडळाचे आयोजन

बल्लारपूर : विसापूर येथील भाजपाच्या महिला आघाडी व रणरागिणी महिला मंडळाच्या वतीने स्थानिक पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालय मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांनी सादर केलेल्या कलाविष्काराने चांगलीच रंगत आणली.महिलांच्या सुप्तकलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विविध स्पर्धा पार पडल्या. यावेळी विजेत्यांना तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करून गौरव करण्यात आला.

.     कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली पंदीलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता तामेश्वरी ठारे, महिला रोगतज्ञ डॉ.श्वेता मानवटकर,मुख्याध्यापक सुचिता जिरकुंटावार,माजी जिल्हा परिषद सदस्य सुमन गौरकार, माजी पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, मुख्याध्यापक माधुरी अंडेलवार, माजी पंचायत समिती सदस्य रंजना थेरे, ग्रामपंचायत सदस्य विद्या देवाळकर, सुरेखा ईटनकर, माजी सरपंच रिता जिलटे, शारदा डाहुले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी टिपले, नंदूरकर यांची उपस्थिती होती.

.     या दरम्यान महिलांसाठी समूह नृत्य, एकल नृत्य, सासुसून नृत्य, गायन, फॅन्सी वेशभूषा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. त्याच प्रमाणे आनंद मेळावा घेण्यात आला. यातील विजेत्यांना तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली पंदीलवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

error: Content is protected !!