Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात ५७ जणांचे रक्तदान

लोकमान्य महाविद्यालयात ५७ जणांचे रक्तदान

249

‘आरोग्य’ थीमवर रांगोळी स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान प्रक्रियेतील सर्वांची भूमिका मातृत्वाची व सहकार्याची असावी

मान्यवर व आयोजकांचे प्रतिपादन

वरोरा : येथील लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवाशक्ती विचार मंच आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवाशक्ती विचार मंचाचे लोकेश रुयारकर व डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अमित तुपे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी व आयोजकांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “रक्तदान प्रक्रियेत सर्वांची भूमिका ही मातृत्वाची व सहकार्याची असणे आवश्यक आहे. रक्त कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही, ते केवळ दात्यांच्या दातृत्वातूनच मिळते. ज्याप्रमाणे विहिरीतील पाणी उपसा केल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो, त्याचप्रमाणे रक्तदानाने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन अनेक आजारांना आळा बसतो. एकदा रक्तदानाची सवय लागली की ते रक्ताच्या नात्यासारखे कायम टिकते.”

.      या प्रसंगी ‘अवयवदान, रक्तदान आणि आरोग्य’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. प्रा. खिरटकर, प्रा. बदखल व प्रा. शास्त्रकार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

.      कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका साक्षी नवघरे हिने केले. प्रास्ताविक रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शेंडे यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार प्रेरणा गारघाटे हिने मानले.

.      या रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकशिक्षण संस्थेतील कर्मचारी, वरोरा परिसरातील रक्तदाते, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, युवाशक्ती विचार मंचचे पदाधिकारी आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!