हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व श्रद्धेय बाबा आमटे कुटुंबियांतील जुन्या आठवणींना उजाळा
महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव विकास आमटे यांचा जन्मदिवस शिवसेनेतर्फे (ऊबाठा) साजरा
चंद्रपूर/वरोरा
. महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोराचे सचिव, ज्येष्ठ समाजसेवक,, विकास आमटे यांचा जन्मदिवस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शाल श्रीफळ प्रदान करून सन्मान सत्कार करण्यात आला तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे आनंदवनातील अपंग तथा विकलांगांना सायकल वाटप करण्यात आल्या.
. विकास आमटे यांच्यासोबत चर्चा करताना ठाकरे कुटुंब व आमटे कुटुंब यांच्यातील जिव्हाळ्याच्या जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला. विकासभाऊंनी ठाकरे कुटुंबीयांसोबत त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले सख्य व जुन्या गोड अनुभवांना उजाळा देत अनेक अनुभव कथन केले. यावेळी बोलत असताना विकास भाऊ भावनिक होऊन गेले होते आणि शिवसेनेचे कार्य हे या क्षेत्रात जोरदार सुरू असून ते असंच तेवत ठेवावं असा आशीर्वादही दिला.
. यावेळी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कडु , सदाशिव ताजणे, शकिल पटेल, शिवसेना वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले, शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, शहर अध्यक्ष खेमराज कुरेकार, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकार, हरि रोडे, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, प्रा. प्रिती पोहाणे, शाखा प्रमुख ललिता बोथले, शुभांगी अहिरकर, मुक्ता हजारे आदी उपस्थित होते.

