Home सामाजिक बोडखा मोकाशी येथे बाळ शिवभक्तांच्या उत्साहात शिवजयंती साजरी

बोडखा मोकाशी येथे बाळ शिवभक्तांच्या उत्साहात शिवजयंती साजरी

323

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

चिमुकल्यांनी दिली शिवरायांच्या जीवनावर भाषणे 

वरोरा : तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती’ आणि बाळ शिवभक्तांच्या वतीने शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातून भव्य रॅली काढण्यात आली असून, ‘हर हर महादेव’च्या गर्जनांनी अवघा परिसर शिवमय झाला होता.

.      या सोहळ्यात बाळ शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली जीवनावर प्रेरणादायी भाषणे सादर केली. यावेळी बोलताना उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश चिडे यांनी शिवरायांनी अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र करून ‘हिंदवी स्वराज्य’ कसे निर्माण केले, याचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. तसेच, “बोडखा मोकाशी येथे दरवर्षी अशाच प्रकारे शिवजयंतीचा उत्सव अखंडपणे सुरू राहील,” असा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यांचे लाभले सहकार्य
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद तुराळे, मेघनाथ तुराळे, करण तडस, धनराज पेंदोर, वैभव तुराळे, भूषण बरडे, जगदीश अवचट, समीर तुराळे, अमित कामडी, मयूर तडस, सोहम चिडे, गणेश घेणघारे, विशाल बगणे, प्रज्वल थाटे, अंश भोयर, करण कुत्तरमारे, करण कामडी आणि अजय पेंदोर यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यात राधा तुराळे, तनु तुराळे, सानू तुराळे यांसह अनेक बाळ शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!