Home सामाजिक विसापूर ग्रामपंचायत मध्ये दिलीप बैलनवार प्रशासक म्हणून रुजू

विसापूर ग्रामपंचायत मध्ये दिलीप बैलनवार प्रशासक म्हणून रुजू

284

बल्लारपूर : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या विसापूर ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून पंचायत विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार यांनी शनिवारी आपला पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे गावातील विकासकामांना आता नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

.     नवनियुक्त प्रशासक दिलीप बैलनवार यांचे ग्रामपंचायत कार्यालयात आगमन होताच उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

.     पदभार स्वीकारल्यानंतर बैलनवार यांनी तातडीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी गावातील प्रलंबित समस्यांचा आढावा घेतला. विशेषतः पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी कडक सूचना दिल्या. गावातील नळयोजनेचा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू राहिला पाहिजे, तसेच घंटागाडीद्वारे होणारी साफसफाई वेळेत व्हावी, जेणेकरून ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

.     या बैठकीत लिपिक वर्गासह सर्व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!