Home सामाजिक भद्रावतीत आचार्य वेरुळकर गुरुजींचा जन्मदिवस ‘संस्कार दिन’ म्हणून साजरा

भद्रावतीत आचार्य वेरुळकर गुरुजींचा जन्मदिवस ‘संस्कार दिन’ म्हणून साजरा

294

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी आणि आध्यात्मिक सादरीकरणाने रंगला सोहळा

वासावी कन्यका माता मंदिरात विविध उपक्रम

भद्रावती : संस्कार मूर्ती आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भद्रावती येथील वासावी कन्यका माता मंदिर परिसरात ‘संस्कार दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्षभर नियमितपणे चालणाऱ्या संस्कार केंद्रातील विद्यार्थी, युवा शक्ती आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

आध्यात्मिक व सांस्कृतिक सादरीकरण
कार्यक्रमाची सुरुवात आर्या कुत्तरमारे व उन्नती गावंडे यांनी गायलेल्या सामुदायिक प्रार्थनेने झाली. क्षमता महाकाळकर हिने गुरुजींचा प्रेरणादायी जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. आध्यात्मिक सत्रात मुग्धा कुत्तरमारे हिने श्रीमद्भगवद्गीतेतील ६ व्या अध्यायातील श्लोकांचे सुश्राव्य सादरीकरण केले, तर विजया ताजने हिने त्यातील जीवनसार मराठीतून समजावून सांगितले.

.      यावेळी श्रेयस डंभारे, रिहान काळे, हार्दीक गावंडे, अर्णव रासेकर, अद्विक ठाकरे, तन्वी देवतळे आणि अर्पित जांभुळकर या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांचे श्लोक, भजन आणि ग्रामगीतेतील ओव्यांचे प्रभावी सादरीकरण केले. आभा कंचनवार व स्वराज गारघाटे यांनी प्रार्थनेचे आयुष्यातील स्थान स्पष्ट केले, तर डिंपल भडगरे हिने महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले.

बक्षीस वितरण व समारोप
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना उल्हासजी भास्करवार व मुरलीधरजी मेश्राम यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल गावंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन गुणवंत कुत्तरमारे यांनी प्रभावीपणे सांभाळले. गजानन डंभारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

.      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासवी कन्यका माता मंदिर समितीचे निलेश गुंडावार, समीर उपलंचीवार आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रवंदना आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्वांनी गुरुजींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

error: Content is protected !!