साई डान्स स्टुडिओ ग्रुप ठरला प्रथम विजेता : मुकेश जिवतोडे यांचे उत्कृष्ठ आयोजन
वरोरा
. येथील मराठी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने भव्य गरबा व दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला वरोरा वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला असून स्पर्धा बघण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्तीथी दर्शविली होती. या स्पर्धेत साई डान्स स्टुडिओ ग्रुप प्रथम विजेता ठरला असून आर्य ग्रुप द्वितीय तर जय माता जी ग्रुप तृतीय विजेता ठरला.
. मराठी दुर्गा उत्सव मंडळ गेला 15 वर्षापासून दरवर्षी नवरात्री निमित्त दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना करून विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. यावर्षी सुद्धा मंडळाचे अध्यक्ष मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात भव्य रास गरबा व दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीच्या 9 दिवस चालेल्या कार्यक्रमात पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी मंडळ, डॉक्टर, नगर परिषद कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विशेष कर्तुत्वान व्यक्तींचा मंडळाच्या वतीने सन्मान तसेच सत्कार करण्यात आला.
. या स्पर्धांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होत त्यांच्यातील कलाविष्काराचे सादरीकरण केले.तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवत गरबा तसेच दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. या स्पर्धेत साई डान्स स्टुडिओ ग्रुप ने प्रथम पारितोषिक मिळवले तर आर्या ग्रुप द्वितीय व जय माता जी ग्रूपने तृतीय पारितोषिक मिळवले.तसेच या स्पर्धेचे बेस्ट कपल प्रथम बक्षीस शुभम नकवे व सम्यता जूनघरे तर द्वितीय कुणाल बिरिया व श्रुती कुरेकार व तृतीय बक्षीस अनिकेत तुराणकर व श्रेया मेश्राम यांनी देण्यात आले. तसेच बेस्ट ऑफ वरोरा (पुरुष) संकेत तुराणकर व बेस्ट ऑफ वरोरा (महिला )ज्ञानेश्वरी पाल यांना बक्षीस देण्यात आले.
. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भरत तेला, रवी बिरीया, मंगेश डाहुले, सतीश कतोरे, पंकज खाजोने, हर्षल मोटके, निकेश मोटके, अतुल नांदे , विक्रम कुंभलकर, गणेश साठे, राहुल पानघाटे, सौरभ कातोरे, शुभम काकडे, पंकज बोडे, हर्षद घोडीले, विपुल पिदुरकर, दीप कतोरे , राकेश नावघरे, सोहम भोयर, प्रशांत भोयर, ऋतिक भोयर, तेजस वंदिले, कुणाल तारशेट्टीवार, तेजस भोयर, रोशन वरघणे,सागर क्षीरसागर,अमित निब्रड, दिनेश यादव,मनीष काळबांडे, शरद परसुटकर आदी उपस्थित होते.


