Home सामाजिक भद्रावतीत गरबा दांडिया उत्सव उत्साहात

भद्रावतीत गरबा दांडिया उत्सव उत्साहात

1030

भद्रावती

.           भद्रावती दांडिया गरबा उत्सव समितीमार्फत तीन दिवसीय गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत चाललेल्या “भद्रावती गरबा दांडिया उत्सव समिती” महोत्सव स्पर्धेचा समारोप मोठया थाटात संपन्न झाला. या दांडिया स्पर्धेसाठी अनेक गरबा गृप नी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

.           भद्रावती गरबा दांडिया महोत्सवातील स्पर्धेत विजेत्या संघांना व काहींना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. गृप मधील प्रथम पारितोषिक डॉ. माला प्रेमचंद यांच्या हस्ते ११,१११/- रूपये रोख ए बी गृप आणि रामलीला गृप यांना देण्यात आले.

.           द्वितीय पारितोषिक  महेंद्र गावंडे यांच्या हस्ते ८,१११/- रुपये रोख भद्रावती ग्रुप ला देण्यात आले. तृतीय पारितोषिक लोकमत सखी मंच व इनरव्हील क्लब यांच्या हस्ते ५,१११/- रुपये रोख क्षत्रिय कस्तीया ग्रुप ला देण्यात आले.
तसेच वैयक्तिक बक्षीस मध्ये – बेस्ट किंग सावन आत्राम, बेस्ट वुमन रिना बोढाले, बेस्ट लूक साक्षी मेश्राम, बेस्ट कपल प्रज्ञा धुळे व रिना बोढाले, बेस्ट किड्स शिफा पवार यांना आकर्षक बक्षीस, शील्ड व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोबतच या स्पर्धे दरम्यान प्रश्नमंजुषा कार्यक्रम प्रेक्षकांकरिता घेण्यात आली. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना गिफ्ट व्हाउचर व रोख रक्कम समितीमार्फत देण्यात आले. या स्पर्धेत अनेकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व भद्रावतीकरांचे आपल्या न्यृत्य कलेने मन जिंकले.

.           या समारोपीय कार्यक्रमात बोलताना समितीचे उपाध्यक्ष . विक्रांत राजेश बीसेन यांनी सांगितले की, भद्रावती गरबा दांडिया उत्सव समितीचा महोत्सव व ही स्पर्धा ही भद्रावतीतील जनतेसाठी एक लोकप्रिय सण व आनंदोत्सव आहे. या महोत्सवामुळे भद्रावती शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. नवीन येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होऊन यामुळे होणाऱ्या कलागुणाचा प्रोत्साहन मिळते असे यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार भांदककर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ए पी आय वर्मा पोलीस स्टेशन भद्रावती, विमला इन्फ्रास्ट्रक्चर महाप्रबंधक महेंद्र गावंडे, माजी नगरसेवक रेखा खुटेमाटे, स्वाती चारी प्रा.वर्षा धानोरकर, कीर्ती गोहणे, सुनंदा खंडाळकर, माजी नगरसेवक शारदा ठवसे, माजी नगरसेवक प्रशांत डाखरे, तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष  स्वप्निल मत्ते, उपाध्यक्ष  विक्रांत बिसेन, सचिव निखिल उंबरकर, सहसचिव श्वेता उंबरकर, कोषाध्यक्ष  सोनल उमाटे, सहकोषाध्यक्ष मनोज पेटकर, समिती प्रभारी अंकित तोडे, व इतर सदस्य  प्राध्यापिका रश्मी बीसेन, केशनी हटवार, हर्षदा हिरादेवे, आशिष मल्लेलवार, प्रज्ञा धुळे, सचिन पाटील, नितेश बानोत, अक्षय लोहकरे, बंटी रायपुरे, रीना बोढाले, समय हिरादेवे, प्रशिक लोणारे, सपना कुटेमाटे व समस्त भद्रावती कर व हेल्पिंग हँड्स एनजीओ, बिसेन कम्प्युटर एजुकेशन,रोटरी क्लब, लोकमत सखी मंच, इनरव्हील क्लब, ऑल रिलीजन युथ फाऊंडेशन, स्वराज्य वीर संघटना, सेवा फाऊंडेशन असे विविध संघटनांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!