नेरी येथील लाभार्थी संतापले : आनंदाचा शिधा कागदावरच
ग्रामस्थांचा आरोप
नेरी
. नेरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेमध्ये स्वस्त धान्याचे रेशन कार्ड धारकांना वितरण केले जाते मात्र मागील दोन महिन्यांपासून या संस्थेत लाभार्थी असणाऱ्या रेशन कार्डधारकांना धान्यच मिळाले नाही असा आरोप लाभार्थ्यांनी केला असून या महिन्यात फक्त तांदूळच वितरित केला गेल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांना गहू किंवा मका मिळाला नाही तसेच शासनाच्या आनंदाचा शिधा या योजनेतून धान्याची किट वितरित केल्या गेली ती किट लाभार्थ्यांच्या खातेपुस्तिका मध्ये खतविण्यात आली.
. मात्र लाभार्थ्यांना दिलीच नसल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले असून खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे नागरिक बोलत आहेत या सर्व प्रकारची चौकशी करून स्वत धान्य वितरित करणाऱ्या जवाबदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून यात समाविष्ट असणाऱ्या सर्वावर कारवाई करून मागील दोन महिन्याचा शिधा वितरित करावे आणि सदर स्वत धान्य दुकान बंद करून दुसऱ्याकडे द्यावे अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
. शासनाने गोरगरीब जनतेच्या हितासाठी स्वत धान्य दुकाने सुरू करून अल्प किमतीत धान्य उपलब्ध करून दिले आहे आणि शासनस्तरावरून वितरण प्रणाली केली आहे मात्र नेरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मध्ये मागील अनेक महिन्यापासून घोळ सुरू असून लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून मागील दोन महिन्यांपासून धान्याचे वितरण केलेच नसल्याचे आरोप लाभार्थ्यांनी केला आहे यामुळे या संस्थेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे शासनाने गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा शंभर रुपयात वितरित करण्याची योजना आणली असून शिधा वितरित केला मात्र या संस्थेत काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालाच नसून गणेशोत्सव मध्ये वितरित केलेल्या किट चे काही लाभार्थ्यांच्या पुस्तिकेवर दिल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्ष तो दिलाच नसल्याचे लाभार्थी आरोप करीत आहेत आता शासनाने धान्य वितरण प्रणाली मध्ये नवीन नियम काढला असून ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात नेण्याचे आदेश दिले आहे. मात्र असे असताना मागील दोन महिन्याचे धान्य संस्थेने का वितरित केले नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा यात भ्रष्टाचार झाला असावा अशी शंका लाभार्थी उपस्थित करीत आहेत कारण याच गावातील बाकी संस्थेत धान्य वितरित केले गेले.
. परंतु याच संस्थेने का केले नाही असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत तेव्हा या सर्व प्रकारची सखोल चौकशी प्रशासनाने करून दोषींवर कारवाई करावी. तसेच यात सहभागी सर्व यंत्रणेचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मागील दोन महिन्याचा धान्याचा वितरण गोरगरीब लाभार्थ्यांना करावा अशी मागणी राशन धारक लाभार्थ्यांनी केली आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात वाटप करावयाचे धान्य 28 तारखेला प्राप्त झाले व धान्य प्राप्त होताच 2-3 दिवसात शक्य होईल तेवढा लाभार्थ्यांना दिला.मात्र 1 तारखेला मशिन बंद झाली त्यामुळे वाटप झालेला नाही. याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. वरिष्ठांनी प्रकरणाची गांभीर्यओळखून मशिन तत्काळ सुरू करून माल वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. रमेश बोलधने, व्यवस्थापक, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था नेरी र.न. 201
सदर प्रकरणात तहसीलदार कार्यालयाला पत्र देऊन माल वाटप साठी मुदतवाढ मागितली असून ऑनलाईन मुदत वाढ किंवा ऑफ लाईन मुदत वाढ देण्यात यावी जेणेकरू आलेले माल लाभार्थ्यांना वितरित करता येईल. संजय डोंगरे, अध्यक्ष, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था नेरी र. न. 201

