Home सामाजिक ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश

ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश

328

भद्रावतीतील ‘सोलर’ ग्राहकांना अखेर मिळाली वीज बिले !

गौतम नगरमधील नागरिकांचा संभ्रम मिटला

महावितरणकडून तत्काळ कार्यवाही

भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. भद्रावतीतील गौतम नगर परिसरातील सोलर मीटरधारक वीज ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली वीज बिले अखेर वितरित करण्यात आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे संभ्रमात असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी
सोलर मीटरधारक ग्राहकांना नियमित वीज बिले मिळत नसल्याने अनेक तांत्रिक व आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. यासंदर्भात दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीच्या वतीने महावितरणकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. या पत्रात ग्राहकांच्या समस्यांचा सविस्तर पाढा वाचून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या विषयाचे गांभीर्य ओळखून ‘नवामार्ग न्यूज पोर्टल’नेही १० फेब्रुवारी रोजी बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

         https://navamarg.com/2026/02/17684/

प्रशासकीय हालचाली आणि यश
तक्रारीची गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यानुषंगाने आज दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी गौतम नगरमधील सोलर मीटर वीज ग्राहकांना प्रत्यक्षात बिलांचे वितरण करण्यात आले. दीर्घकाळ बिले न मिळाल्याने नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले होते, मात्र आता ही समस्या मार्गी लागली आहे.

यांचे लाभले सहकार्य
या यशस्वी पाठपुराव्यामध्ये ग्राहक पंचायतीचे शाखा अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, डॉ. ज्ञानेश हटवार, भारत खोब्रागडे, विनोद ठमके, सोनल वावरे, गुरूदेव बावणे, करूणा मोघे आणि प्रतिक्षा बनकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या यशाबद्दल अनेक नागरिकांनी फोनद्वारे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत. आगामी काळातही नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविण्याचा निर्धार ग्राहक पंचायतीने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!