Home सामाजिक नंदोरी येथे रंगणार शिवजन्मोत्सवाचा सोहळा

नंदोरी येथे रंगणार शिवजन्मोत्सवाचा सोहळा

331

ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराजांच्या ‘भव्य कीर्तनाने’ होणार प्रारंभ

आजी-माजी सैनिकांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांची मांदियाळी

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराज यांचा होणारा ‘भव्य कीर्तन सोहळा’ असून, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

कीर्तन सोहळा आणि उद्घाटन
कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने होईल. त्यानंतर लगेच सायंकाळी ७:३० वाजता सोपानदादा कनेरकर महाराज आपल्या अमोघ वाणीतून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित कीर्तन सेवा रुजू करतील. या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. याच दिवशी देशरक्षणासाठी समर्पित राहिलेल्या आजी-माजी सैनिकांचा विशेष गौरव सोहळाही पार पडणार आहे.

सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम

१८ फेब्रुवारी ला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शिवराय, संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण होईल. तर १९ फेब्रुवारी ला पहाटे ६ वाजता स्वच्छता अभियान, दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा आणि दुपारी २ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता शिवरायांची भव्य शोभायात्रा निघेल, तर रात्री ९ वाजता बक्षीस वितरणाने सोहळ्याची सांगता होईल.

error: Content is protected !!