चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु) येथील लहान हनुमान देवस्थानच्या प्रांगणामध्ये आज, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नंदोरी-मुधोली मंडळ (ग्रामीण) तालुका कोषाध्यक्ष गुरुदेव रामकृष्ण हरणे, सामाजिक कार्यकर्ते कैलास ढवस, आकाश मोंढे, पवन जिवतोडे, निखिल ताजणे, रितीक ताजणे आणि सौरभ आस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
. या अभिवादन कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नारायण गेडाम, नागो चामाटे, पंढरी एकरे, भास्कर अंड्रस्कर, रामचंद्र अहिरकर, पाकमोडे, दिपक अहिरकर, प्रशांत अहिरकर, अनिकेत हरणे, सुरेश खापणे, सचिन उमरे, किशोर भडगरे, विष्णु रडके, विठ्ठल साळवे व इतर ग्रामस्थांचा सहभाग होता. पंडितजींचा ‘अंत्योदय’ हा विचार प्रत्येकाने आत्मसात करावा, असा सूर या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.


