Home सामाजिक गुरुकुलच्या चिमुकल्यांचा नृत्याविष्कार : विसापूरकर झाले मंत्रमुग्ध!

गुरुकुलच्या चिमुकल्यांचा नृत्याविष्कार : विसापूरकर झाले मंत्रमुग्ध!

308

वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात स्वागत गीत, लावणी अन् गोंडी नृत्याची मेजवानी

गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गौरव

बल्लारपुर : विसापूर येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथील सार्वजनिक मंचावर वार्षिक सांस्कृतिक महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभक्तीपर गीते, लावणी, भारूड, चित्रपट संगीत आणि पारंपारिक गोंडी नृत्यांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित विसापूरकरांची मने जिंकली.

मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवाचे उद्घाटन विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या माधुरी अंडेलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. लिपिक संतोष निपुंगे, मुख्याध्यापिका भारती पांजनकर (चंद्रपूर), ॲड. रुबिना मिर्झा, ग्रा.पं. सदस्य विद्या देवाळकर, अनिल टोंगे, सादीक शेख, विराज मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा गौरव व मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला मोठे महत्त्व आहे. ही शाळा भावी पिढी सुसंस्कृत आणि गुणवान घडवण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे.” प्राचार्या माधुरी अंडेलवार यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

परिश्रम व नियोजन
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रिना चिकाटे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी किरण वैद्य, समीक्षा खैरकर, सोनल, अमृता तामगाडगे, टीना बर्नाड यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनात विशेष परिश्रम घेतले. चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने आणि पदलालित्याने विसापूरचा परिसर मंत्रमुग्ध झाला होता.

error: Content is protected !!