पेरणी केलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवीला
वरोरा
. तालुक्यातील कोसरसार या गावातील सावकारी कर्जामुळे काही दिवसााअगोदर शेतकऱ्यांनी फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती. आता त्याच मृतक शेतकऱ्यांच्या मुलाला आज त्याच्यात शेतात जाऊन मारहाण केली व पेरणी केलेल्या शेतात ट्रॅक्टर खाजगी सावकाराने चालवला.
. मृतक शकर पांडुरंग तडस यांनी सावकार पुडलिक गुळघाने कोसरसार हल्ली मुकाम रा. चंद्रपूर यांच्या कडून शेती खर्चा साठी रक्कम घेतल्याचे बोलले जाते. परंतु ह्या रकमेची मुद्दत संपली मनून सावकाराने शेतकऱ्यांस त्रास देणे सुरु केले माझे घेतलेले पैसे परत दे नाही तर तुझे शेत तब्यात घेतो. शेतकऱ्याने या चिंते ने आपली जीवन यात्रा संपवली. हे सर्व झालेले वेव्हार शेतकऱ्याच्या मुलाला काहीच माहित नसल्याचे पीडित शेतकऱ्याचा मुलगा नामे प्रशांत शंकर तडस याने सांगितले .माझ्या शेतात मी चना या पिकाची पेरणी तीन दिवसााअगोदर केली असून पीडित शेतकराच्या मुलगा दुपारी शेतावर गेला असता सावकार आपल्या मुलांना घेऊन पेरलेल्या शेतावर ट्रॅक्टर चालवत असल्यामुळे पीडित मुलाने त्याना विरोध केला. त्यात सावकार पुडलिक गुळघाने व त्याची मुले सचिन पुंडलिक गुळघाने पंकज गुळघाने आणी गावातील नानाजी गुळघाने यांनी पीडित मुलाला जबर मारहाण केली. या प्रकरणातील संबंधित सर्व गुन्हेगारा वर तात्काळ कार्य्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माझ्या वडिलांनी यांच्या सोबत कोणता व्यवहार केला हे मला काहीच माहित नाही वडिलांच्या मृत्यू नंतर माझ्या घरी माझी आई मीच असतो या आधी पन सावकार पुंडलिक गुळघाने यांनी मला धमकी दिली की तुझ्या बाबांनी घेतलेले पैसे परत कर नाही तर तुला मारून टाकीन आज मी घरी एकटाच करणारा असून। शेतात तीन दिवसााअगोदर चना पिकाची पेरणी केली आज मी पाहणी करण्याकरिता गेलो असता पुडलिक गुळघाने आणी त्याचे मुले गावातील नातेवाहीकाचा ट्रॅक्टर घेऊन माझ्या पेरलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसले मी विरोध केला असता मला जबर मारहाण करण्यात आली गावातील लोक माझ्या मदतीला आले म्हणून मी आज वाचलो नाही तर माझा आज मर्डर या लोकांनी केला असता. पुढे चालून माझ्या जीवाचे काही बरेवाईट हे लोक करायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून ज्यांनी मला मारहाण केले याच्या वर गुन्हा तात्काळ दाखल करावा. प्रशांत शंकर गुळघाने पिडीत शेतकरी


