तरुणांनी सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे डॉ. प्रशांत पाठक यांचे आवाहन
विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळणार वाव
भद्रावती : येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाद्वारे चोरा येथे विशेष श्रमदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचा शुभारंभ झाला.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रा. प्रशांत पाठक यांनी तरुणांना सामाजिक ऋणाची जाणीव करून दिली. “आजच्या तरुणाईला दिशा मिळणे गरजेचे असून, राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक उत्तरदायित्व फेडण्याचे उत्तम माध्यम आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्यांनी शिबिराचा हेतू स्पष्ट केला, तर प्रा. कपिल राऊत यांनी शिबिराच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन आणि महापुरुषांचे विचार रुजवण्यावर भर दिला. एन.एस.एस. अधिकारी प्रा. विशाल प्रसाद यांनी विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि राष्ट्रीय चळवळीतील सहभागाचे कौतुक केले.
. या शिबिरात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी प्रा. प्रज्ञा लांडे यांनी केले, तर आभार प्रा. प्रिती कनकट्टीवार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. नेहा मानकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


