सामाजिक बांधिलकीचा जपला वारसा
स्व. चंद्रभागाबाई घुमे बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम
संजय दानव यांचा वाढदिवस आणि स्व. पुष्पलता घुमे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
वरोरा : सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून स्थानिक ‘स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुद्देशीय संस्थेच्या’ वतीने २५ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा येथे पार पडलेल्या या शिबिरात २४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
. सदर शिबिराचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय दानव यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय पुष्पलता मारोती घुमे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.
![]()
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे आणि नगरसेविका मनीषा दानव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मारोती घुमे, सचिव आशिष घुमे, पत्रकार सारथी ठाकूर व अभिषेक भागडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नगरसेवक संतोष पवार, प्रवीण चिमुरकर, अक्षय भिवदरे यांच्यासह भरत तेला, सचिन तडस, मंगेश पिसाळ, संजय गयनेवार, अमित आसेकर आणि महादेव पारखी या सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.
कार्यकर्त्यांचे परिश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशांत साळवे, चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, फिरोज शेख, सुनील इंगळे, आशिष करडभूजे, शंकर आत्राम आणि हर्षल दानव यांनी अथक परिश्रम घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे वरोरा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


