Home सामाजिक कुचना येथील शुभम आणि करणची सैन्यदलात झेप

कुचना येथील शुभम आणि करणची सैन्यदलात झेप

356

गावात जंगी सत्कार सोहळा संपन्न

माजरीचे ठाणेदार अमित पांडे यांच्या हस्ते गौरव

तरुणांनी देशसेवेसाठी प्रेरित होण्याचे आवाहन

कुचना : येथील बुद्ध विहारांमध्ये गावातील दोन कर्तबगार तरुणांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शुभम खस यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) आणि करण कुसूमैय्या यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाल्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

.        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित पांडे उपस्थित होते. तसेच कन्होबा तिखट, कुचनाच्या पोलीस पाटील योगिता बंड, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी परचाके, देवराव अवथरे आणि बाबाराव वानखेडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

युवकांनी गावाचे नाव उज्ज्वल केले
यावेळी बोलताना ठाणेदार अमित पांडे व इतर मान्यवरांनी युवकांचे कौतुक केले. “शुभम आणि करण यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सैन्यदलात स्थान मिळवून गावाचे नाव मोठे केले आहे. इतर तरुणांनी देखील या दोघांपासून प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी आपले योगदान द्यावे,” असे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल ताजने यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दुर्गे, राजेंद्र वैद्य, युवराज घायवन, योगीराज तांदुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्कारामुळे कुचना गावात आनंदाचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिक या दोन्ही नवविर्वाचित जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

error: Content is protected !!