वरोरा
. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान सन 2021-2022अंतर्गत जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत चिनोरा ला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. .नूतन सावंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) यांच्या हस्ते सरपंच ताई परचाके, उपसरपंच वंदना ढेगळे, ग्रामसेवक चापले यांना दोन लक्ष रुपयाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
. यावेळी अविनाश ढेगळे उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त करण्यास सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी व ग्राम वासियाचे सहकार्य लाभले पुन्हा गाव विकास साठी सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असे मत सरपंच ताई परचाके व उपसरपंच वंदना ढेगळे यांनी व्यक्त केले व सर्वाचे आभार मानले.


