Home सामाजिक माजरी येथील शिवशक्ती दांडिया उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

माजरी येथील शिवशक्ती दांडिया उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

975

 मुलीं व महिलांनी बक्षीसांसह लुटला दांडिया महोत्सवाचा आनंद 

माजरी 

.              येथील शिव-पार्वतीश्वर मंदिरात २१ ते २३ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रीच्या पृष्ठभूमीवर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित शिवशक्ती दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दांडीया गरबा स्पर्धेत माजरी परिसरातील शेकडो महिला व मुलींनी यात सक्रिय सहभाग घेतला होता. सोमवारी या तीन दिवसीय दांडिया गरबा स्पर्धेची सांगता होऊन बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

.              या गरबा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट नृत्य, वेशभूषासह विविध गुणांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांकरिता प्रथम,द्वितीय आणि तृतीय बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक , तृतीय क्रमांक तसेच बेस्ट परफामर म्हणून निवड करून त्यांना रोख आणि चषक देवून हे बक्षीसे प्रदान करण्यात आले. दरम्यान प्रोत्साहनपर बक्षिसात विशेष महीला म्हणून शोभा चंदनखेडे या जेष्ठ महिलेला देण्यात आले.

.              या स्पर्धेस परीक्षक म्हणून अवॉर्ड विजेता नृत्यांगणा ज्योती रामावार, ओमकार भसारकर हे होते. बक्षिस वितरण सोहळ्यास आयोजक स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, अध्यक्ष धनराज आस्वले, ट्रस्टचे विश्वस्त सुषमा शिंदे, रुपाली शिंदे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोराचे शहर प्रमुख खेमराज कुरेकार, घनश्याम आस्वले, माजी जि.प.सदस्य प्रवीण सुर, सरपंच छाया जंगम, ग्रा. पं. सदस्य उषा कुडदुला, संपदा वनकर, विभा सिंग, अमर जुमडे, महिला संघटिका गायत्री यमलावार आदी उपस्थित होते. दरम्यान ज्या महिलांमुळे दांडिया उत्सवात स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या अश्या महिलांना भेटवस्तू देऊन सम्मानित करण्यात आला.

.              माजरी परिसरात पहिल्यांदाच दांडियाचे आयोजन झाल्याने लहान मुलीं व महिलांसाठी कला व संस्कृतीचा प्रदर्शनासाठी व्यासपीठ मिळवून दिल्याने स्पर्धकांनी आयोजकांचे आभार मानले. या उत्सवाने परिसरात नवरात्रीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून आले. या दांडिया उत्सवात कायद्याच्या चौकटीत राहून माजरीकर कार्यक्रमाचा आनंद लुटला. उत्सवात सुरक्षा कवच म्हूणन कार्य करणाऱ्या २५ स्वयंसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्पर्धेकांचा व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

.              या कार्यक्रमाला माजरीकर हजारोंच्या संख्येने हजेरी लावली त्याबद्दल शिवशक्ती दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष रविशंकर राय, कार्याध्यक्ष रवि भोगे यांनी सर्वांचे आभार मानले.

    कार्यक्रमात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच कार्यक्रमस्थळी माजरी पोलिसांकडून विविध प्रकारच्या सतर्कतेचे फलक लावून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.

error: Content is protected !!