२७ जानेवारीपासून रंगणार थरार
प्रथम पारितोषिक ३० हजार रुपये व भव्य चषक
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
भद्रावती : तालुक्यातील पिरली येथे अंबरदादा अशोक जिवतोडे यांच्या वतीने आणि ‘ॲग्रेसिव्ह चॅलेंजर क्रिकेट क्लब’ (AGGRESSIVE CHALLENGER CRICKET CLUB), पिरली यांच्या वतीने भव्य ‘खरी बॉल’ क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ पासून येरगुडे यांच्या भव्य पटांगणावर होणार आहे.
![]()
भरघोस बक्षिसांची लयलूट
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख रकमा व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अंबर अशोक जिवतोडे यांच्याकडून विजेत्यांना भव्य चषक प्रदान करण्यात येणार असून, प्रथम पुरस्कार ३० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार २० हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये ठेवण्यात आला आहे. तसेच, सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. नत्थुजी तरारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी सरपंच विजय तरारे, सोसायटी अध्यक्ष विष्णुदास मत्ते आणि सुजल ट्रेडर्सचे गजानन कुत्तरमारे यांच्याकडून आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि बेस्ट ऑलराऊंडरसाठी प्रवीण मुळे यांच्याकडून विशेष पुरस्कार देण्यात येतील.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार उद्घाटन सोहळा
मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होईल. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजयजी देवतळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद अंबर अशोक जिवतोडे भूषवणार आहेत.
. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सरपंच वर्षा विजय तरारे, उपसरपंच नेताजी पिंपळशेंडे, ग्रामअधिकारी वामन राजुरकर, शुभम येरगुडे, मुख्याध्यापक संगेल, शीतल देठे, निशा काळे, विष्णुदास मत्ते उपस्थित राहतील. तसेच निर्दोष मडावी, गणेश कुत्तरमारे, रजनी पुरी, शिल्पा कावळे, श्रीरंग ठेंगे, प्रवीण मुळे व गजानन कुत्तरमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेची नियमावली
सामने ७ ओवरचे राहिल व २ ओवर पॉवप्ले राहील, एक खेळाडू एकाच संघात खेळदिल्या जाणार, प्रत्येक संघाना सुरवातीला २ सामने खेळविण्यात येईल, सामना सुरू होण्यापूर्वी संघाला अर्धा तास आधी हजर राहावे लागेल, सामने सकाळी ८ ते ५ खेळविले जाईल, प्रत्येक सामन्यामध्ये संघात ४ बॉलर अनिवार्य राहील, रबरी बॉल मंडळाकडून विकत घ्यावा लागेल, पंचाचा निर्णय अंतिम राहील, नैसर्गिक आपत्तीश मंड जवाबदार राहणार नाही, वाद-भांडण गैरवर्तन केल्यास संघाला बाद करण्यात येईल, अंतिम सामना १० ओवरचा राहील तसेच संघात 5 बॉलर अनिवार्य राहील.
आयोजक व नियोजन समिती
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अंकित येरगुडे, उपाध्यक्ष रमेश आत्राम, सचिव अक्षय कुळमेथे, सहसचिव राकेश मुळे, कोषाध्यक्ष आकाश कामडी, राकेश कोलते, कर्णधार राहुल मत्ते, उपकर्णधार गजेंद्र पुरी, श्रीकांत कोलते, श्रीओज शेंडे, सोशल मीडिया हँडलर कुणाल येरगुडे व धनंजय कोलते परिश्रम घेत आहेत.
निर्णय समिती व पंच
संदीप मडावी, संकेत सातपुते, सुरज गेडाम, धीरज कोलते यांच्यासह निर्णय समिती, तर सतीश पुरी, शुभम कोलते, प्रवीण मुळे, कैलास मडावी व गोकुळ भोस्कर पंच म्हणून काम पाहतील. स्कोरर म्हणून शुभम मत्ते, शुभम येरगुडे, गणेश खेडेकर जबाबदारी सांभाळतील, तर समालोचन (कॉमेंट्री) विष्णुदास मत्ते, शंकर खवसे व विजय तरारे करतील.
प्रवेशासाठी संपर्क
स्पर्धेसाठी प्रवेश फी १५०० रुपये आहे. (लेट फी २०००, तक्रार फी २०००). नाव नोंदणीसाठी अंकित येरगुडे 9834679479, अक्षय कुळमेथे 9579877422, धनंजय कोलते 9284136389, राकेश मुळे 7972639732 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले.


