वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

39

 खरकाडा शेत शिवारातील घटना  

नेरी

.              चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या खरकाडा शेतशिवारात दि24 च्या पहाटे एका पट्टेदार वाघाने शेतात बांधलेल्या बैलजोडीवर हल्ला केला या हल्ल्यात एका बैलाला पकडून जागेवरच ठार केले तर सदर दुसऱ्या बैलाच्या ओरडण्यामुळे मालक जागे झाले बैलाकडे जाताच वाघ घटनास्थळा वरून पसार झाला तोपर्यंत बैल ठार झाला होता.

.              सदर बैल हा खरकाडा येथील विलास संतोष हिवरकर यांच्या मालकीचा असून शेतीला पाणी करण्यासाठी बैल बंडीने ऑइल इंजिन शेतशिवारात नेले रात्री 2 वाजेपर्यंत पाणी करून आराम करीत असताना शेतात बांधलेल्या बैलावर पट्टेदार वाघाने पहाटे चार वाजता च्या सुमारास हल्ला केला व जागेवरच ठार केले सदर घटनेची माहिती वनाधिकारी याना देताच क्षेत्रसहायक अधिकारी रासेकर वनरक्षक येरने व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले तात्काळ पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर केला सदर बैल हा जवान असून अंदाजे 90 हजार रुपये किमतीचा असल्याने सदर बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग व नागरिकांनी केली असून खरकडा परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे