Home सामाजिक चंद्रपुरात ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा दणक्यात शुभारंभ

चंद्रपुरात ‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा दणक्यात शुभारंभ

334

१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार जिल्हाव्यापी अभियान

सिकलसेल मुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने ‘अरुणोदय’ या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे उत्साहात पार पडला. एका सिकलसेल रुग्ण सीमा चानुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या महत्त्वपूर्ण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

मोहिमेचे स्वरूप आणि उद्दिष्
ही विशेष मोहीम जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल रुग्णांची तपासणी, अचूक निदान, मोफत उपचार, तज्ज्ञांचे समुपदेशन आणि व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी प्रास्ताविकात या मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

वेळेवर निदान हीच जगण्याची गुरुकिल्ली
कार्यक्रमाला संबोधित करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे म्हणाले की, “सिकलसेल हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसला तरी, वेळेवर निदान आणि नियमित उपचारांमुळे रुग्ण सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतो. ‘अरुणोदय’ अभियानाद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे.”

प्रशासकीय उपस्थिती:
या कार्यक्रमाला दुर्गापूरचे उपसरपंच प्रज्योत पुणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर आणि जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

.      कार्यक्रमाचे संचालन तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश कुंभारे यांनी केले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वर, सुभाष सोरते आणि दुर्गापूर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!