Home सामाजिक वरोरा नगर परिषदेत विविध समिती सभापतींची निवड

वरोरा नगर परिषदेत विविध समिती सभापतींची निवड

403

शहराच्या विकासासाठी नवे चमू सज्ज

नगराध्यक्षा ठाकरे आणि मुख्याधिकारी मेश्राम यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न

वरोरा : येथील नगर परिषद कार्यालयात आज विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक उत्साहात पार पडली. नगर परिषदेचे पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम आणि नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत सर्व सभापतींची निवड करण्यात आली.

.       निवडणूक प्रक्रियेनंतर नवनियुक्त सभापतींनी अधिकृतपणे आपले पदग्रहण केले. यामध्ये बांधकाम सभापती मनिष जेठानी, स्वच्छता व आरोग्य सभापती मंगला पिपंळकर, पाणी पुरवठा सभापती गजानन जिवतोडे, नियोजन सभापती राहुल देवडे, शिक्षण सभापती योगीता नेरकर, महिला व बाल कल्याण सभापती रेखा तेलतुंबडे, महिला व बाल कल्याण उपसभापती सुषमा चांभारे यांची वर्णी लागली तर नगर परिषदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये गजानन मेश्राम आणि अभय ठावरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

.        या निवडीनंतर नगराध्यक्षा अर्चना ठाकरे आणि मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या नव्या चमूने जोमाने काम करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

.       या विशेष प्रसंगी विलास नेरकर, आशिष ठाकरे, जयंत ठमके, नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक प्रदीप बुराण, नगरसेवक बंडू देऊडकर, राजकुमार खंडारे, नगरसेविका रोशनी भडके, सुधाकर कुंकुले, भारत नेरकर यांच्यासह नगर परिषदेचे इतर सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने झालेल्या या बिनविरोध निवडीचे शहरात स्वागत होत आहे.

error: Content is protected !!