Home विदर्भ माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी उसळला भक्तीचा महासागर

माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी उसळला भक्तीचा महासागर

921

चंद्रपूर

.             श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा समारोप झाला आहे. यावेळी निघालेल्या माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला होता. या नगरप्रदक्षिनेत सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

.             महाकाली मंदिर जवळून नगरप्रदक्षिणा पालखीला सुरवात झाली. तत्पूर्वी चार दिवस महाकाली मंदिर जवळील पटांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, यात धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश होता. सदर कार्यक्रम पाहण्यासाठीही मातेच्या भक्तांची मोठी गर्दी केली होती. या दरम्यान 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन करण्यात आले. तर 11 हजार 111 दिवे प्रज्वलीत करत परिसर लखलख करण्यात आला. नवरात्रो दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना महोत्सव समीतीच्या वतीने चांदिचे नाणे देण्यात आले.

error: Content is protected !!