Home विदर्भ कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती द्वारे शेतमाल खरेदीचा शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती द्वारे शेतमाल खरेदीचा शुभारंभ

917

भद्रावती

.             कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार नंदोरी अंतर्गत अदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी येथे शेंडे ऍग्रो ट्रेडर्स अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ ( दि. 24 ) ला करण्यात आला.

.             पहिल्याच दिवशी 105 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली व शेतमालाला भाव 4651/-रूपये देण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे व उद्घाटक म्हणून बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, उपसभापती अश्लेषा (भोयर) जिवतोडे यांच्यासह भद्रावती कृ.उ.बा.समिती संचालक गजानन उताणे, संचालक कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे, राजेंद्र डोंगे, प्रवीण बांदुरकर, राजु आसुटकर व बाजार समितीचे सर्व संचालक तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह अदिती काँटन इंडस्ट्रीजचे अविश बाहे, सुभाष बाहे, किशोर वालदे, शेंडे ऍग्रो ट्रेडर्सचे गुणवंत शेंडे उपस्थित होते.

.             याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या पाच शेतकरी हरिदास रोडे कांसा, अरुण राजूरकर कोंढा, पुरुषोत्तम आसुटकर मासळ, संजय ताजणे जेना, संदीप ढेंगळे टाकळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी विठ्ठल टोंगे, विलास पालकर, रमेश सकिनवार व गणेश नागोसे यांनी सहकार्य केले.

.             चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला शेतमाल उपबाजार आवार नंदोरी येथे अदिती काँटन इंडस्ट्रीज टाकळी येथे विक्रीस आणावे असे संयुक्त आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ताजने, उपसभापती अश्लेषा (भोयर )जिवतोडे आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले.

error: Content is protected !!