Home पोलीस डायरी गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

914

नागभीड

.          तालुक्यातील येनोली माल येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात मोहाच्या झाडाला फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव प्रमोद कुकसू रामटेके( 42)असे असून तो नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील रहिवासी आहे.

.          मृतक प्रमोद रामटेके याच्या मागे पत्नी,दोन मुलें,आई,वडील, व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र अचानक घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे आभाळ कोसळले आहे.

.          याबाबत तळोधी पोलीस स्टेशनला कळविण्यात आले असून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीड येथे पाठविला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सहदेव गोवर्धन, पोलीस अंमलदार दिलीप चौधरी, सहाय्यक फौजदार सुधाकर भानारकर पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!