कबड्डीत चरूर (धा) तर खो-खोमध्ये चंदनखेडा संघ ठरला अजिंक्य !
‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नरवीर तानाजी क्रीडांगणावर दोन दिवस रंगला खेळांचा थरार
विजेत्या खेळाडूंचा गौरव
भद्रावती : युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि खेळांच्या माध्यमातून ‘सुदृढ भारत’ संकल्पनेचा प्रचार व्हावा, या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘मेरा युवा भारत’, चंद्रपूरच्या वतीने १० व ११ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. चंदनखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नरवीर तानाजी क्रीडांगणावर या स्पर्धा संपन्न झाल्या.
. या दोन दिवसीय महोत्सवात मुलांसाठी कबड्डी, १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि मुलींसाठी खो-खो, १०० मीटर धावणे व गोळाफेक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध गावांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडा कौशल्य पणाला लावले.
![]()
स्पर्धेचा निकाल मुलांच्या गटात गोळाफेक मध्ये प्रथम – अमोल गायकवाड (विलोडा), द्वितीय – दीपक श्रीरामे (वायगाव), तृतीय – कृष्णा आनंदराव मुडेवार, १०० मीटर धावणे मध्ये प्रथम – दीपक श्रीरामे (वायगाव), द्वितीय – सागर मुरलीधर गुरुनुले, तृतीय – चंद्रशेखर विठ्ठल झिंगरे, कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक – बाल विकास क्रीडा मंडळ, चरूर (धा), द्वितीय क्रमांक – एकलव्य क्रीडा मंडळ, चंदनखेडा तर मुलींच्या गटात गोळाफेक मध्ये प्रथम – अवनी अनिल भरडे (सातारा), द्वितीय – श्रावणी रवींद्र नन्नावरे, तृतीय – अश्विनी माधव दडमल, १०० मीटर धावणे मध्ये प्रथम – अवनी अनिल भरडे, द्वितीय – कृतिका वासुदेव दडमल, तृतीय – पूर्वी सुनील कोकुडे, खो-खो मध्ये प्रथम क्रमांक – चंदनखेडा संघ, द्वितीय क्रमांक – चरूर (धा) संघ विजयी ठरले.
या क्रीडा महोत्सवाच्या प्रसंगी गावातील व परिसरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते, माजी जि.प. सदस्य मारोती गायकवाड, सरपंच नयन जांभुळे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती मनोहर हनवते, पोलीस पाटील समीर खान पठाण, मुख्याध्यापक, नेहरू विद्यालय यशवंत पुनवटकर, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा सोनोने, मुख्याध्यापीका, जि.प. शाळा आईंचवार, अनिल कोकुडे, राजू नामपल्लीवार, चंद्रशेखर निमजे, अनिल चौधरी, विकास दोहतरे, गुलाब भरडे, सिंगलदीप पेंदाम, गजेंद्र रणदिवे, लोकेश कोकुडे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रधार दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे संचालन राकेश क्षीरसागर यांनी केले. ‘मेरा युवा भारत’ केंद्राचे जिल्हा अधिकारी सुशील भड यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला, तर उपस्थितांचे आभार शुभम भोस्कर यांनी मानले.
“खेळामुळे युवकांचे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुदृढ राहते. खेळाडू वृत्तीतून एक आदर्श समाज घडण्यास मदत होते. ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे.” विठ्ठल हनवते, (माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक)
संयोजन आणि सहकार्य या क्रीडा स्पर्धांचे आयोजन ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सुशील भड व ए.पी.ए. मंगेश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. माजी तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा शौर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध मंडळांनी व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात संस्था व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले. यात शौर्य क्रीडा मंडळ, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, वीरांगणा मुक्ताई क्रीडा मंडळ (चरूर धा), बिरसा बचत गट (कोकेवाडा मा). तसेच कार्यकर्ते व स्वयंसेवक राहुल कोसुरकार, शुभम भोस्कर, राहुल चौधरी, गणेश हनवते, मंगेश हनवते, स्वप्निल कुळसंगे, निकेश पाठक, शुभम जांभुळे, मंगेश नन्नावरे, पुरुषोत्तम चौखे, प्रणित हनवते, विजयकुमार नन्नावरे, लोकेश कोकुडे, महेश केदार, रोशन मानकर, प्रवीण भरडे, कुणाल ढोक, शंकर दडमल, दिलीप ठावरी, प्रज्वल बोढे, देवानंद दोडके, स्वप्निल दडमल, आदित्य दोडके, अमोल महागमकार, ऋत्विक नन्नावरे, जित कोकुडे, विराम श्रीरामे, ओम कोकुडे, अनिकेत बुरेवार, रोशन चौधरी, रोशन क्षीरसागर, राकेश क्षीरसागर, प्रशांत नन्नावरे, विकास नन्नावरे, उमेश नन्नावरे, पवन भोस्कर, सतीश उरकांडे, गणेश नन्नावरे, वैभव भरडे, वृषभ दडमल, प्रेम सोनुले, हुसेन शेख, फिरोज पठाण, कादिर पठाण, सुधाकर दोडके, प्रभाकर दोडके, अयुब शेख, गणेश काटवले, आशा नन्नावरे, अमृता कोकुडे, सुनंदा नन्नावरे, गौरी वालदे, कमल दडमल, मंगला महागमकर, वर्षा ढोणे यांचे यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सर्व विजेत्या संघांना आणि वैयक्तिक खेळाडूंना सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘मेरा युवा भारत’ च्या स्वयंसेवकांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.


