» 300 नागरिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
» नंदोरी येथील पूल निर्मिती साठी 1 कोटी 97 लाखांचा निधी मंजूर
भद्रावती : नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित पुलाच्या मागणीला अखेर यश आले आहे. शासनाकडून १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल ४ जानेवारी रोजी नंदोरी येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
. या प्रसंगी इंदिरानगरमधील सुमारे ३०० नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नंदोरी येथील पुलाच्या अभावामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मागील वर्षी कवडु येटे यांचा पुलाअभावी वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. या प्रश्नावर काढण्यात आलेल्या ‘पायदळ यात्रा’ आंदोलनामुळे व नंदोरी गावकऱ्यांनी केलेल्या मतदानावरील बहिष्काराने प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि निधी मंजूर झाला. हा विजय जनतेच्या एकजुटीचा असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, जिल्हाप्रमुख आलेख रट्टे, सुमित हस्तक, सुरज शाहा उपस्थित होते. तसेच नवनियुक्त नगरसेवक महेश जीवतोडे व संतोष कुरेकार यांचाही सत्कार करण्यात आला.
. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन इंदिरानगरच्या ३०० रहिवाशांनी भगवा हाती घेतला. यामुळे भद्रावती तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. पुलाचे काम तातडीने व दर्जेदार न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिवसेना नेत्यांनी दिला.
. या कार्यक्रमाचे नियोजन युवासेना तालुका संघटक निलेश उरकुडे व चंदू मडावी यांनी केले होते. यावेळी माजी सभापती धनराज विरुटकर, ग्रा.पं. सदस्य किशोर उमरे, सुष्मलता ठेंगणे, मुनेश्वर बदखल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते.


