Home सामाजिक भद्रावतीत ६ जानेवारी ला ‘मराठी पत्रकार दिन’ व ‘ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक...

भद्रावतीत ६ जानेवारी ला ‘मराठी पत्रकार दिन’ व ‘ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ’ सोहळा

382

भद्रावती : भांदक प्रेस क्लबच्या वतीने ‘मराठी पत्रकार दिन’ आणि ‘ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ’ मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.

.        या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दैनिक सह्याद्रीचा राखणदार’चे वरिष्ठ संपादक डॉ. यशवंत घुमे राहतील. विशेष अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बालाजी कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.

.       कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ‘दैनिक पुण्यनगरी’चे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटीक आणि ‘दैनिक नवजीवन’चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे, आयटक कामगार संघटना माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. युवराज धानोरकर, भांदक प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर पारधी आणि सचिव वतन लोणे उपस्थित राहणार आहेत

.       याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये मुन्तजिर हुसैन अजानी (मुन्ना सेठ), पुरुषोत्तम स्वान, अनिल धानोरकर, प्रफुल चटकी, ज्येष्ठ पत्रकार अशोक पोतदार, दिलीप ठेंगे, डॉ. राकेश तिवारी, संगीता ठमके आणि ह.भ.प. नागोराव पेंदोर यांचा समावेश आहे. तसेच आंतरशालेय सामूहिक नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी व संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष अविनाश सिध्दमशेट्टीवार यांच्या हस्ते केले जाईल.

.       या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील बिपटे, सुनील पतरंगे, ईश्वर शर्मा आणि अब्बास अजानी यांनी केले आहे.

error: Content is protected !!