बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील जेष्ठ नागरिकांनी एकत्र येत नुकतीच माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली. यामध्ये विसापूर जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त शिक्षक सुरेश पंदीलवार यांची, तर सचिव पदावर सुरेश इटनकर यांची सर्वानुमते निवड केली.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच बंडू गिरडकर, माजी पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर टोंगे, अशोक तुराणकर, प्रभाकर कळसकर, रत्नाकर टोंगे, नागोराव कुत्तरमारे, अनंतसुर्गीव वानखेडे, दादाजी जीवने, उलमाले बाबु यांची उपस्थिती होती. गावातील जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात भेडसावणाऱ्या समस्या आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी जेष्ठ नागरिक संघाची संकल्पना मान्यवरांनी व्यक्त केली. त्यानुसार विसापूर जेष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
. विस्तारीत कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून सुरेश पंदीलवार, कार्याध्यक्ष प्रभाकर टोंगे, सचिव सुरेश इटनकर, सहसचिव अशोक तुराणकर, उपाध्यक्ष हरिश्चंद्र थेरे, कोषाध्यक्ष रत्नाकर टोंगे तर सल्लागार म्हणून प्रभाकर कळसकर, शालीक नांदे, रामदास हरणे, सुधीर गिरडकर, सुनिल बुटले, परमेश्वर पुणेकर, संजय डाहुले यांचा समावेश करण्यात आला आहे. सभेचे संचालन अशोक तुराणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश पंदीलवार यांनी केले.


