खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती
चंद्रपूर : पुणे येथे ‘धनोजे कुणबी सामाजिक संस्था’ तर्फे आयोजित ३५ व्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष उपस्थिती लावून समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा आणि गुणवंतांचा सत्कार केला.
. यावेळी बोलताना खासदार धानोरकर यांनी म्हटले केले की, समाजातील गुणवंतांचा आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा केवळ सोहळा नसून तो समाजातील तरुणांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा उपक्रम आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाज बांधणीला अधिक बळकटी मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
. गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या धनोजे कुणबी सामाजिक संस्थेच्या कार्याचे खासदार धानोरकर यांनी विशेष कौतुक केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
. या मेळाव्याला राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा सामाजिक एकोपा आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला आहे.


