Home सामाजिक विसापूर ग्रामपंचायत तर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

विसापूर ग्रामपंचायत तर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

398

बल्लारपूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरु करून महिलांसाठी शिक्षणाचे दालन उघडले. आद्य महिला शिक्षकीका म्हणून त्यांचा गौरव आहे. त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

.        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर, सुरेखा ईटनकर, विद्या देवाळकर, शशीकला जीवने, रिना कांबळे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, सुरज डबरे, अशोक ठुणेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रेल्वे चौकातील पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

error: Content is protected !!