वरोरा : वरोरा नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांचा पदग्रहण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा आता ठाकरे यांच्या खांद्यावर आली असून, वरोऱ्यात एका नवीन विकास पर्वाची सुरुवात झाली आहे.
. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून नवनियुक्त नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. “जनतेने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत, शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी अर्चना ठाकरे निश्चितच कटिबद्ध राहतील,” असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
. या पदग्रहण समारंभाला खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष अहतेशाम अली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष विलास नेरकर, काँग्रेस चे वरोरा तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, काँग्रेस चे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, काँग्रेस चे वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, काँग्रेस च्या शहर अध्यक्ष यशोदा खामणकर, आशिष ठाकरे आणि प्रदीप बुरान यांची विशेष उपस्थिती होती.
. नगराध्यक्षांसोबतच वरोरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन मेश्राम (गटनेता), बंडू देऊळकर, राहुल देवळे, मनीष जेठानी, अनिल झोटिंग, खेमराज कुरेकार, सुष्मा चांभारे, रोशनी भडके, मंगला पिंपळकर, कुणाल रुयारकर, अभय ठावरी, गजानन जिवतोडे, योगिता नेरकर, तेलतुमडे आणि राजकुमार खंडारे यांनीही उपस्थित राहून शहराच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
. नव्या जबाबदारीचा स्वीकार केल्यानंतर अर्चना ठाकरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वरोरा शहराला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता जोमाने कामाला लागणार, हे या सोहळ्याने अधोरेखित केले आहे.


