तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु. येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दि. १, २ आणि ३ जानेवारी २०२६ या दरम्यान तीन दिवसीय विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा आयोजित केला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत भजनांचे कार्यक्रम, प्रवचन आणि ग्रामगीतेवर आधारित प्रबोधनपर उपक्रम राबविले जाणार आहेत.
. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार असून, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याला उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ, नंदोरी बु. तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


