Home सामाजिक ​वरोरा येथे भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

​वरोरा येथे भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

433

​बुद्ध धम्माचा प्रचार आणि संघटनात्मक बांधणीवर भर

जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

​वरोरा : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवली बुद्ध विहार, टिळक वार्ड येथे पार पडले. या शिबिरात संघटनात्मक कार्य आणि धम्म विचारांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

.     ​ या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष आनंद वनकर, जिल्हा महासचिव ज्ञानानंद शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष कात्यायन शेंडे आणि जिल्हा विधी संचालक राजकला रंगारी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

.      ​ यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद वनकर यांनी ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची ध्येयधोरणे आणि भविष्यातील कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा कोषाध्यक्ष कात्यायन शेंडे यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्याची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकला. तर जिल्हा महासचिव ज्ञानानंद शिंदे यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील तत्त्वज्ञान सांगून धम्माचा प्रचार-प्रसार कसा करावा, याबाबत कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले.

.       ​या शिबिरात कमलाकर कातकर, रवींद्र मोहोळ, संभा देवगडे, अशोक देवगडे, बबनराव पुसाटे, डॉ. रंगशाम मोडक, अनुसया पेटकर, आदेश अलोणे, हरिभाऊ दारुडे, धीरज हस्ते, परशुराम फुललेले, विजयराव धोपटे, निर्गुण पेटकर, राजेश नंदेश्वर, अमित गजभिये, पंडितराव बोरकर, शिलाताई ढोकणे, शोभाताई मोरे, डॉ. दीपक अंबादे, विठ्तल काळे, विश्वजीत गजरे, मधुकर गोवर्धन आणि भीमराव शेंडे यांच्या सह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ​याप्रसंगी वरोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका रेखा तेलतुंबडे तसेच मालती कांबळे, विद्या गोरघाटे, सिंधुताई देवगडे यांचाही सत्कार करण्यात आला.

​.       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आभार अमित गजभिये यांनी मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!