खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती
कांग्रेसच्या विजयात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. यामध्ये कांग्रेसच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. आपल्या सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. मतदारांच्या विश्वासाला खरे उतरवले पाहिजे, असे आव्हान चंद्रपूर जिल्हा कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी बल्लारपूर येथील नवनिर्वाचित अध्यक्ष अलका अनिल वाढई व १७ नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात केले.
![]()
. बल्लारपूर येथील माजी नगराध्यक्ष स्व. पुंडलिकराव माकोडे यांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष धोटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंग रावत, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे, नवनिर्वाचित अध्यक्ष अलका वाढई, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, माजी न. प. उपाध्यक्ष डॉ. सुनिल कुल्दीवार, डॉ. अनिल वाढई, भास्कर माकोडे, नरेश मुंदडा यांची उपस्थिती होती.
. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर व कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष अलका वाढई आणि नवनिर्वाचित नगरसेवक छाया मडावी, वैष्णवी जुमडे, शिल्पा चुटे, अंम्कुबाई भुक्या, मोना प्रमोद धानोरकर, वैशाली हुमने, प्रियंका थुलकर, ॲड. मेघा भाले, शारदा भास्कर माकोडे, सुनिता जिवतोडे, करुणा रेब्बावार, ॲड. पवन मेश्राम, देवेंद्र आर्य, अब्दुल करीम, सय्यद मुक्कदर सय्यद हमजा, इस्माईल ढाकवाला, रवि चंद्रय्या मातंगी यांचा पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.


