Home सामाजिक ग्रामपंचायत विकास आराखडाबाबत कार्यशाळा

ग्रामपंचायत विकास आराखडाबाबत कार्यशाळा

435

भद्रावती : पंचायत समिती भद्रावती सभागृहात आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सन 26-27 साठी ग्रामपंचायत विकास आराखडाबाबतचे तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

.       या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्य परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिना सांळुके होत्या. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ होते. प्रमुख अतिथी सहा. गट विकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार, बाविप्रअ पुनम गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, उपविभागीय बांधकाम अभियंता खराटे, वि. अ. पंचायत प्रकाश पारखी, वि. अ. कृषी प्रमोद ढोरे होते.

.      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस द्विपप्रजल्वन करुन मालार्पण करण्यात आले. प्रथम उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंके व गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी ग्रामपंचायत चालबडीॅ येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाची तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी कार्यशाळेत मिना सांळुके यांनी अभियानाचे मुख्य घटक सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द, स्वच्छ व हरीत गाव निर्माण करणे,मनरेगा व इतर योजना अभिसरण, गावपातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजिवीका विकास, सामाजिक कार्य व लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे,नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले व आशुतोष सपकाळ यांनी गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी शिक्षण, आरोग्य, उपजिवीका, महीला व बालविकास, अनु. जाती-जमातीचा विकास होणेसाठी व्यापक लोकसहभागातून आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडाचे प्रशिक्षण मनोगतात व्यक्त केले.

.      या कार्यशाळेचे संचालन प्रमोद ढोरे, प्रास्ताविक, आभार सहा. गविअ डॉ. बंडुआकनुरवार यांनी केले. कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती होते.

error: Content is protected !!