घुग्घूस शहरातील नवऱदेवाने दिला लोकशाहीचा आदर्श संदेश
सुरेश खडसे
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात नगर परिषद मतदानाच्या पहिल्या दिवशी लग्नाच्या वेशात नवऱदेवाने (अक्षय चिमणे) यांनी जनता विद्यालय घुग्घूस या मतदान केंद्रावर पोहोचून बूथ क्रमांक 3 मध्ये मतदान केले व सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले.
. घुग्घूस शहरात आज मतदानाच्या दिवशी एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. लग्नाकरिता सजलेल्या नवऱदेवाने नागपूर येथे जाऊन बोहल्यावर चढण्यापूर्वी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. लग्नाच्या वेशभूषेतच केंद्रावर पोहोचलेल्या अक्षय चिमणे या नवऱदेवाने व परिवारातील सदस्यानी आदर्श नागरिकत्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
. घुग्घूस शहरात सकाळपासूनच मतदान प्रक्रिया कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली आहे. शहरातील 11 प्रभागांसाठी आज मतदान होत असून एक नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवकांची निवड होणार आहे. स्त्री 15567, पुरुष 16917 इतर 4 असे एकूण 32488 मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
. अशा पार्श्वभूमीवर लग्नाच्या अगदी आधी नवऱदेवाने मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाही हक्क बजावला. सामाजिक जाणीव जपणाऱ्या या कृतीमुळे मतदानाला प्रोत्साहन मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.मतदान करण्यापूर्वी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले नंतर जनता विद्यालयात बूथ क्रमांक तीन मध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला नवऱदेवाला विचारणा केली असता आधी मतदान करून नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आणि नागपूर येथे रवाना होऊन नंतरच लग्नाच्या सात फेऱ्या घेणार आहोत.”असे अक्षय चिमणे यांनी सांगितले त्यांच्या या भूमिकेमुळे तरुण मतदारांमध्येही सकारात्मक संदेश गेल्याचे दिसत आहे.


