Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवघ्या ४८ तासांत घरफोडीतील आरोपी जेरबंद

अवघ्या ४८ तासांत घरफोडीतील आरोपी जेरबंद

442

देवालय सोसायटीतील घरफोडी प्रकरण

भद्रावती पोलिसांची कारवाई

भद्रावती : भद्रावती शहरातील विंजासन परिसरातील देवालय सोसायटीत घरफोडी करून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. बंटी सुभाषचंद्र भद्रा (४४, रा. खापरखेडा, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

.       पोलीस सूत्रानुसार आरोपीकडून दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट व रोख ५० हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. उर्वरित रक्कम सुमारे तीन लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

.       देवालय सोसायटीत राहणारे तनुज पंडीले हे दिनांक १८ डिसेंबर रोजी कुटुंबासह यवतमाळ येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने त्यांचे घर फोडून घरातील साडेतीन लाख रुपये रोख व दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. लग्न आटोपून घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच पंडीले यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

.       तक्रारीची दखल घेत भद्रावती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन दिवसांत आरोपीला अटक केली. ही कारवाई ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोळे व प्रेम बावणकर यांनी केली.

error: Content is protected !!