Home सामाजिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत फेअरी लँड शाळा द्वितीय

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत फेअरी लँड शाळा द्वितीय

441

भद्रावती : तालुक्यातील तांडा येथील घमाबाई आश्रम शाळेत पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत गैर आदिवासी प्राथमिक विभागात फेअरी लँड शाळेने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

.         शाळेतील शिक्षिका सविता बगडे, कीर्ती कळस्कर व प्राजक्ता हातझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली असीम शब्बीर शेख, प्रिया बीरेंद्र पाल आणि संस्कार राजेश्वर पेटकर या विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट प्रतिकृती सादर केली होती. त्यांच्या सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

.        या विज्ञान प्रदर्शनीला तुकाराम पवार, तहसीलदार बालाजी कदम, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकळकर, पुनम गेडाम, सिद्धमशेट्टीवार , स्वाती महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष ॲड. युवराज धानोरकर, सचिव वर्षा धानोरकर, मुख्याध्यापिका प्रज्ञा ठाकरे तसेच शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!