Home सामाजिक जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा

जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा

436

कुचना : जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या वतीने पुरुषांसाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर होते तर
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, विधानसभा संघटक किशोर बावणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिवाकर पावडे, उमेश बोडेकर, अमृता सुर, रवींद्र धोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

.       या स्पर्धेत परिसरातील विविध संघांनी सहभाग घेतला. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पाडले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!