Home राजकीय बल्लारपुरात कांग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांचा प्रचाराचा धडाका

बल्लारपुरात कांग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांचा प्रचाराचा धडाका

685

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेत भारतीय राष्टीय कांग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका अनील वाढई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आज नगरपालिकेत निवडणुकीतील उमेदवारांचे चिन्ह वाटप होताच अलका व त्यांचे पती डॉ. अनील वाढई यांनी विविध वार्डात घरोघरी भेट देत निवडून येण्यासाठी मतदारांना विनंती केली. कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य व माजी अध्यक्ष अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात त्यांनी बल्लारपूर शहरातील सर्वच समाजातील घटकांना कांग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान मतदारांना केले.

.      बल्लारपूर नगरपालिकेत कांग्रेसपक्षाने वैद्यकीय सेवा देणारे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक डॉ. अनील वाढई यांच्या पत्नी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अलका वाढई यांना उमेदवारी दिली आहे. त्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे. त्यांचे पती डॉ. अनील वाढई हे मागील ११ वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. मितभाषी म्हणून ते बल्लारपूर शहरात ओळखत आहे. कांग्रेस पक्षाचे बल्लारपूर शहरात पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत सर्वांचा त्यांना पाठिंबा असून अलका वाढई यांची उमेदवारी कांग्रेस पक्षासाठी नवसंजीवनी देणारी ठरत असल्याची भावना मतदारांना भावत आहे.

.        एकेकाळी बल्लारपूर शहरातील नगरपालिका क्षेत्रातील राजकारण कांग्रेस पक्षासाठी अनुकूल होते. मात्र शहराच्या राजकारणात भाजपाचा शिरकाव झाल्यामुळे काहिसे माघारले.मात्र कांग्रेस पक्षाने सारासार विचार करून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. अनील वाढई यांच्या पत्नी अलका वाढई यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय वर्तुळात मतदारांना समाधान वाटत आहे.

.       बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अध्यक्ष म्हणून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अलका वाढई व 32 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यासाठी कांग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अलका वाढई,त्यांचे पती डॉ. अनील वाढई, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे व अन्य कार्यकर्त्यांचा पाठबळावर त्यांनी शहरात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. यामुळे प्रस्तापित पक्षांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

आज करणार कांग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ                                                                                                                                      बल्लारपूर नगरपालिकेत कांग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई व 32 नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कांग्रेस पक्षाचे विधीमंडळ गट नेते विजय वडेट्टीवार, जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर यांची जाहीर सभा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गुरूवारी आयोजित करण्यात आली आहे.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई, डॉ. अनील वाढई, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम व बल्लारपूर शहरातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढणारे 32 नगरसेवक आपापल्या समर्थांकासह उपस्थित राहणार असल्याची माहिती देवेंद्र आर्य, माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे यांनी दिली आहे. शहरातील मतदारांनी निवडणूक प्रचार सभेला उपस्थित राहावे, असी विनंती कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!