Home विशेष सरकारकडून रब्बी पिकासाठी धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात शासनाचे आदेश असूनही प्रशासनाकडून कारवाई का...

सरकारकडून रब्बी पिकासाठी धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात शासनाचे आदेश असूनही प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही ? – वसंत मुंडे

469

 पुणे : राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकरी आनंदात आहे.परंतु अकार्यक्षम त्रिमूर्ती शासनाकडून रब्बी पिकासाठी शासनाचे आदेशाची पाणी सोडण्यासंदर्भात निष्क्रिय प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप महाराष्ट्र देश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला आहे.

.      शासन स्तरावर सर्व शेतकरी नियमानुसार विविध पिकांचे पानपट्टी भरण्यासाठी तयार आहे परंतु गेली पाच वर्षापासून निष्क्रिय लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात संकोचपणा बाळाला जातो आणि अवैध्य पाणी उपसा धरणातून खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यावरही कारवाई केली जात नाही. जलसंपदा विभागाकडून आदेश असूनही गोदावरी पाटबंधारे महामंडळ कारवाई करीत नाही. सिंचन व्यवस्थापन समितीने ज्या त्या धरणात अंतर्गत कालवी दुरुस्ती व सिंचन निधी संदर्भात यंत्रणेकडून कारवाई करण्यात आदेश असतानाही दुरुस्तीसाठी कारवाई केली जात नाही. बीड जिल्ह्याचे अकार्यक्षम पालकमंत्री लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी जलसंपदा विभाग हा संपूर्णपणे शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ आहे. संपूर्ण धरणे भरलेले असतानाही शासनाचे शेतकऱ्याला तात्काळ पाणी सोडण्यासंदर्भात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश असतानाही निष्क्रिय प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.

.       धरणामधील अवैद्य पाणी उपसा व वीटभटया मुळे अनेक कॅनल खराब झाले असून रस्त्यांच्या दुरुस्त्यामुळे कॅनॉलची तोडफोड करण्यात आलेली आहे. सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या असल्या तरीही निष्क्रिय प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. अगोदरच शेतकऱ्याला हमीभावदराप्रमाणे शेतीमालाला भाव बाजारपेठेत मिळत नाही वेळेवर शासनाकडून पिक विमा विविध अनुदाने शासन स्तरावर वेगवेगळे अटी व नियम टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे तात्काळ पडत नाही. वेगवेगळे जीएसटीचे कर लावून खते बियाणे औषधी शेती अवजारे खूप मोठ्या महाग झाल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेला आहे तरीही त्रिमूर्ती सरकार शेतकरी संदर्भात बाजू घेण्यात अकार्यक्षम आहे. तात्काळ खासबाब म्हणून रब्बी पिकासाठी सर्व धरणाचे पाणी शेतकऱ्याला सोडण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!