Home सामाजिक निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी डीबीटी करून घ्यावी

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी डीबीटी करून घ्यावी

476

महेंद्र फुलझेले यांचे प्रतिपादन

विसापुरात पार पडले निराधारांचे शिबीर

बल्लारपूर : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासनस्तरावर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ मिळण्याबाबत डीबीटी करून घ्यावी. प्रत्येक लाभार्थ्यांनी आधार कार्ड मॅपिंग करून नियमित अनुदानाचा लाभ बॅंक खात्यात जमा होणार आहे, या शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. याचा लाभ निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी करून घ्यावा,असे प्रतिपादन विसापूर येथे डीएलसी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी केले.

.         बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने विसापूर ग्रामपंचायत सभागृहात निराधारांचे विशेष शिबीर गुरूवारी पार पडले. यावेळी शिबीराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. उदघाटक म्हणून नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, प्रमुख अतिथी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, बल्लारपूरचे मंडळ अधिकारी किशोर नवले, सहाय्यक महसूल अधिकारी सोनु गांवडे, ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत, ग्राम महसूल अधिकारी दीपक निंबाळकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

.      यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग करून ज्या लाभार्थ्यांचे अनुदान मिळत नाही. अशा लाभार्थ्यांना डीबीटी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

error: Content is protected !!