Home सामाजिक भद्रावतीत संविधान सन्मान समारोहाचे आयोजन

भद्रावतीत संविधान सन्मान समारोहाचे आयोजन

502

विविध सामाजिक उपक्रम राबवून करणार संविधान दिवस साजरा

भद्रावती : शिलभद्र मंडळ, गौतम नगर तर्फे संविधान दिनानिमित्त संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि.२२ नोव्हेंबर ते दि. २७ नोव्हेंबर पर्यंत होणार असून प्रत्येक दिवशी शहरवासीयांकरिता एक वेगळा कार्यक्रम असणार आहे.

.       दि.२२ नोव्हेंबर ला मोफत आरोग्य शिबीर घेण्यात येणार असून यामध्ये आध्यवी नेत्रालय, चंद्रपूर यांचे कडून नेत्ररोग तपासणी, आरोग्य प्राथमिक केन्द्राकडून बी. पी., शुगर तपासणी होणार आहे. संध्याकाळी “संविधान समजून घेतांना” या विषयावर सामाजिक कार्यकर्ते, विधीतज्ञ ॲड. भुपेंद्र रायपुरे मार्गदर्शन करणार आहे. दि.२३ नोव्हेंबर ला सकाळी मुलामुलींकरिता चित्रकला स्पर्धा, स्पर्धा परिक्षा आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होतील. तसेच संध्याकाळी प्रश्न मंजुषा आणि नृत्य स्पर्धा होणार आहे. दि. २४ नोव्हेंबर ला सायंकाळी ठीक ६ वाजता सायबर सेल विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांचे कडून “सायबर सुरक्षा, मुलामुलींना पोस्को कायदा, मोबाईल च्या अधिकवापरामुळे होणारे परिणाम तसेच सायबर क्राईम याबाबत जनजागृती होणार आहे. दि.२५ नोव्हेंबर ला मुलांसाठी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ नोव्हेंबर ला सकाळी झेंडा वंदन करून संविधान दिन साजरा केला जाणार आहे. दि. २७ नोव्हेंबर ला सायंकाळी स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त मुलामुलींना बक्षीस वितरण करण्यात येणार असून त्यानंतर भद्रावतीकरांसाठी सुमधुर भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

.        त्यामुळे भद्रावती च्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संविधान दिनानिमित्त होणाऱ्या संविधान सप्ताह अंतर्गत असणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिलभद्र मंडळ, गौतम नगर भद्रावती यांचे कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!